Sunday, December 16, 2018

चहा Tea मराठी कविता

चहाला म्हणती सारे
आहे जणू अमृततुल्य
मिळतो जरी स्वस्तात
तरी महागडे आहे मूल्य                                    


चहाचे अनेक प्रकार
'ब्लॅक टी', 'ग्रीन टी'
शौकीनांचा 'स्पेशल चहा'
वजन घटवण्याला 'लेमन टी'

इंग्रजांनी आणला चहा
या सोन्याच्या भारतात
बघता-बघता पसरला
सर्वदूर काना-कोपऱ्यात

सामान्यांचा 'कटींग चहा'
काॅलेजचा 'मसाला चहा'
तुळशीचे मंजिरे घातलेला चहा
एकदा तुम्ही पिऊन तर पहा

सर्दीसाठी 'आल्याचा चहा'
चहाचे असे वेगवेगळे प्रकार
राहिला चहा सदैव इथेच
जरी बदलले सरकार

नवऱ्याने दिले वचन बायकोला
एकदा भांडण झाल्यावर,
"मी रोज बनवेल चहा"
तू थकून घरी आल्यावर

दिलेलं वचन आजही येथे
पती नित्यनेमाने पाळतो
पत्नी थकून घरी आल्यावर
तिच्यासाठी चहा बनवतो


1 comment: