Sunday, December 2, 2018

तुझ्या मिठीतून उलगडतांना..... ( कविता )

तुझ्या मिठीतून उलगडतांना
रात्र हळूच सरत होती...
आणि पूर्व क्षितिजावर सोनेरी रंग पसरले होते...    
       
पक्षी घरट्याबाहेर उडत होते    
बागेतल्या गवतावर दवबिंदूंचे
टपोरे थेंब शोभत होते...

वाढणाऱ्या दिवसाबरोबर
उन्हाचा कडाका वाढत होता...
सर्वांची रेंगाळलेली कामे
पूर्ण होत होती...

चाकोरीबद्ध जीवन जगून
लोक घरी परत येत होते...
पुन्हा एकदा सूर्य
पश्चिम क्षितिजावर अस्ताला जात होता...

परत एकदा तुझी ओढ
जास्त वाटत होती...
त्यासोबतच तुझे बाहूपाश
माझ्याभोवती आवळले जात होते...

वाढणाऱ्या रात्रीबरोबर तुझी मिठी
आणखीनच घट्ट होत होती...
आणि तुझ्या याच घट्ट मिठीतून
उलगडतांना रात्र हळूच सरून जात होती...

No comments:

Post a Comment