Friday, December 7, 2018

बाबासाहेब - क्रांतीचे वादळ ( कविता )


बाबासाहेब, तू क्रांतीचे वादळ
ज्वालाग्राही धगधगती मशाल
गीत गातो तुझ्या क्रांती पर्वाचे
आशीर्वाद द्यावा आम्हां खुशाल..... ।।१।।



सदैव तेजस्वी तू क्रांतिसूर्य
संविधानाचा तू रचनाकार
चवदार तळ्याचा आंदोलनकर्ता
तूच लोकशाहीचा शिल्पकार.... ।।२।। 

   

आमच्या गीतात नाव तुझेच
गातो आम्ही तुझे गुणगान
केला तू दलितांचा उद्धार
महान आहे तुझे जीवनगान..... ।।३।।      



आम्ही दीनदुबळे, दलित
तूच आमचा सांभाळकर्ता
निरक्षर, अंधश्रद्धेचे पुजारी
तूच आमचा रक्षणकर्ता..... ।।४।।


आम्हांसी तू शिकविले
प्रज्ञा, शील आणि करुणा
या निर्मळ गीतातून गातो
बाबासाहेब, तू आमची प्रेरणा.... ।।५।।


परिस्थितीपुढे आम्ही लाचार
आमच्यात होत नाही सुधार
तुझ्यामुळेच समाजात मान
तू केलास दलितांचा उद्धार..... ।।६।।


बाबासाहेब, तू एक महासंग्राम
सदा आठवू  तुझे कार्य प्रशस्त
सदैव आमच्या डोक्यावरी असावा
भिमा, तुझ्या कृपेचा वरदहस्त..... ।।७।।


दिव्याच्या प्रकाशात तू शिकलास
शाळेत गुरुजींनी वर्गाबाहेर बसविले
तू त्या वेळेस वर्गाबाहेर शिकला
म्हणून आज आम्हाला शिक्षण मिळाले..... ।।८।।


तूच आहेस भारताची शान
जयजयकार भिमाचा करूया
अवघ्या विश्व देई तुला मान
नाव बाबासाहेबांचे स्मरुया.... ।।९।।


खूप शिकून बनलास बॅरिस्टर
दलितांचा तू आहेस कैवारी
तुझे समतेचे विचार अंगीकारून
घेऊ आम्ही जगात भरारी..... ।।१०।।



No comments:

Post a Comment