Sunday, December 2, 2018

निसर्गाचा जागर ( कविता )

अंधश्रद्धेला देऊ मूठमाती
आले नवे तंत्रज्ञान जगात
विज्ञानाची धरून कास
जगूया आधुनिक युगात  //१//     

पाने, फुले, शेती, झाडे
निळाशार अथांग सागर
हिरवळ, पक्षी, प्राणी, जीव
निसर्गाचा करूया जागर  //२//

सुंदर पर्यावरण हेच जीवन
नको कारखान्यांचा धूर
हिरवीगार नटतील शिवारे
दुग्धक्रांतीचा वाहेल पूर  //३//

झाडांना नियमित मिळे पाणी
मिळेल सृष्टीला नवा आकार
हसू, खेळू, नाचू, बागडू
नव्या तंत्रज्ञानाने स्वप्न साकार  //४//

होतील आनंदी येथे सगळेच
भासणार नाही सुखाची उणीव
निसर्गाचा राखू आपण समतोल
नेहमी ठेवू कर्तव्याची जाणीव  //५//

No comments:

Post a Comment