Sunday, December 16, 2018

श्री स्वामी समर्थ... अभंग रचना


देवतांचा देव । श्री स्वामी समर्थ ।
कार्य होई सार्थ । कृपेमुळे ॥१॥



मनी आहे भाव । रोजची स्मरतो ।                          

तुलाच पूजतो । देवराया ॥२॥


सर्वांचा तू देवा । ब्रह्मांड नायक ।
जगाचा मालक । स्वामी माझा ॥३॥



श्री स्वामी समर्थ । आमची माऊली ।
कृपेची सावली । अखंडीत ॥४॥



आम्हांवरी देवा । धर छत्रछाया ।
करावीस माया । सदोदीत ॥५॥ 



अस्तित्व हे तुझे । पाषाणी नि जळी ।
काष्ठी आणि स्थळी । तिन्ही लोकी ॥६॥



पाठीशी राहावा । अनाथांचा नाथ ।
नित्य लाभो साथ । या भक्तांना ॥७॥



तुझ्याच कृपेने । मोहोरली सृष्टी ।
ठेवलीस दृष्टी । जगावरी ॥८॥



नाम, जप, यज्ञ । नित्य तुझा करू ।
नेहमीच स्मरू । शिकवण ॥९॥



भिती नाही कधी । तुला रे वाटली ।
करूणा दाटली । सर्वांसाठी ॥१०॥



'उमा' मागे आज । तुझे वरदान ।
विवेकाचे ज्ञान । तू द्यावेस ॥११॥




No comments:

Post a Comment