Saturday, December 1, 2018

काळजाला ( कविता )


तूच केला वार माझ्या काळजाला
का दिला धोका मला तू काळजाला ?                  



वाहिले डोळे नदीच्या सारखे हे
घाव हे ते, जे मिळाले काळजाला



मी रडूनी रोज, ढाळे आसवांना
ज्या क्षणी रे, मारले तू काळजाला



आपली का माणसे देतात धोका ?
आपल्यांचा घात माझ्या काळजाला



वेड का रे लागले वेड्या मनाला
घे अताशा जाणुनी, तू काळजाला 



हे कधी, केव्हा नि का झाले दिलाला
मी कशी सांगू, कळेना काळजाला 



हा फुटल्या बांगडीचा पसारा
काच टोचे रे, रुते हा काळजाला 



वाळले रे घाव आता तू दिलेले
व्रण आहे ते, चरे हे काळजाला



राजसा का तू दिले दुःख असे हे
तूच रे द्यावी दवा ह्या काळजाला 



प्रेम देऊनी बरे आता करावे
आज तू माझ्या 'उमाच्या' काळजाला




No comments:

Post a Comment