भेटली तुझ्यासारखी माणसे
पक्की झाली यारी - दोस्ती
सोबत सर्व मित्र असतांना
नरकातही करूयात मस्ती
म्हणू नकोस ना वाईट
मरून-मरून जगूनसुद्धा
देऊयात संकटाला फाईट
दोस्तांसोबत जगावे मनसोक्त
करून घ्यावी मौज-मजा
चार घडीचे सुखी आयुष्य
कशाला समजावी सजा ?
सोबत जेव्हा तू असशील
तेव्हा कोणाला हवा महाल ?
तुटक्या-पडक्या झोपडीतही
सुंदर जीवन सजेल खुशाल
नको तो चिरेबंदी वाडा
नको ती श्रीमंती खोटी
फसवी शान नको आम्हांला
कष्टाचीच खातो रोटी
हा सूर्य रोजच उगवतो
होते रोज पहाट सोनेरी
आयुष्याचे छान इंद्रधनुष्य
मोरपिशी, चंदेरी, रूपेरी
'उमा' म्हणते, ऐक तू माझे
चेहऱ्यावरी असावे हसू
कंटाळवाणे नको जीवन
डोळ्यांत नसावेत आसू
रूसू नये रे माणसाने
नेहमी दिलखुलास बोलावे
नको तो जीवघेणा राग
आनंदातच आयुष्य तोलावे
No comments:
Post a Comment