पापण्यांच्या महिरपीने
जेव्हा मी झाकले डोळे
माझ्या मृगाक्षी नयनांत
स्वप्नी दिसे तुझे रूप भोळे...
तू आणि मी दूरवर
सुंदरशा गेलो बागेत
तिथे तळे निळेशार
दोघे बसलो नावेत...
तळ्यावरचा सुंदर कारंजा
उडवत होता पाण्याचे तुषार
संगतीला गीत गुणगुणती
जळातील मासे ते हुशार...
हातात घेऊनी हात
मारल्या मनसोक्त गप्पा
दिलखुलास मोकळा केला
हृदयाचा बंद कप्पा...
नावेतील प्रवास झाल्यावर
हिरवळीवर लागलो फिरायला
माझ्या श्वासात श्वास तुझा
राजसा, लागला मिसळायला...
मी झाले तुझी राधिका
तूच तर माझा कृष्णा
येऊनी जवळी मोहना
देहाची भागव तृष्णा...
आईचा आवाज आल्यावर
उलगडले सर्व कोडे
नव्हते सत्यात काहीच
पडले होते स्वप्न वेडे...
No comments:
Post a Comment