दिसता राजसा
अंगाला शहारा
त्याच्याच स्वप्नांचा
मनात पहारा 1
ओझरते देई
चुंबन तो भाळी
लाजता जराशी
गाली चढे लाली 2
बघताच मला
अडवे वाटेत
गुरफटले मी
प्रेमाच्या लाटेत 3
घेऊनी मिठीत
साजणाने घट्ट
आवळले बाहू
काळोखात मिट्ट 4
कुरवाळता तो
अशी चढे धुंदी
डुंबू मिलनात
जगूया स्वच्छंदी 5
राजबिंडे रूप
भारदस्त देह
अंगी बिलगता
सोसवेना दाह 6
माझ्या सर्वांगात
कमळ फुलव
तू मला प्रेमाच्या
झुल्यात झुलव 7
स्पर्शिता तू येई
अंगभर काटा
आहेत देहाच्या
नागमोडी वाटा 8
रंगू तू आणि मी
प्रणयाच्या रंगी
संसार सुखात
दोघेच रे संगी 9
झुंजूमंजू वेळी
मिठी सैल झाली
पहाट प्रभाती
लाज मला आली 10
No comments:
Post a Comment