अशी घडून गेली बात त्या रात्री
कोजागिरीच्या चंद्राची रात त्या रात्री...
मी बघत होतो तुझ्याकडेच, तू मला बघतांना
होते आपले हातात हात त्या रात्री...
होते जरी वेगळे आपण रंगा-ढंगाने
होऊन गेली एक, आपली जात त्या रात्री...
जे आवडते ऐकायला मला तेच
तू होतीस गीत छान गात त्या रात्री...
अशी सतावते भूक पोटात माझ्या
खाल्ला दोघांनी केशरी दूध, भात त्या रात्री...
हवेहवेसे वाटे मजला पान खावे
दिला तुला विडा, चुना, कात त्या रात्री...
डाव छान रंगला आपला पत्त्यांचा
खेळलो आपण बदाम सात त्या रात्री...
धरती होती आसुसलेली, आभाळ वेडे झाले
होऊन गेली प्रेमाची बरसात त्या रात्री...
No comments:
Post a Comment