Sunday, March 31, 2019

पाणी... Water... Marathi kavita... Marathi Poem... मराठी कविता...






तप्त उन्हाने तापली 
बघा काळी माती फार
पाणी पडल्यावरच
होई मग थंडगार... [१]

नभी सूर्य ओकतोय 
किती जीवघेणी आग 
दुष्काळात कशी आता
आम्ही फुलवावी बाग ?... [२]

नद्या साऱ्याच आटल्या
भाग दुष्काळी बनला
पशू, पक्षी, वेली, झाडे
सर्व उत्साह सरला... [३]

पाणी संपले येथले
नाही धरतीला पाणी
कशी गायची रोजच ?
शुष्क, कोरडी विराणी... [४]

पाणी जपून वापरा
करा बचत नेहमी
तर कधी ना होणार
कुणालाच पाणी कमी... [५]

जल म्हणजे जीवन
याचे ठेवू सर्व भान
अपव्यय होऊ नये
याचे नित्य ठेवू ध्यान... [६]



1 comment: