Monday, March 11, 2019

हिजडा... Kinnar... Transgender... Marathi Poem... Marathi Kavita... मराठी कविता...


जन्मलो तृतीयपंथी म्हणुनी
ह्यात काय आहे आमचा दोष ?
जगण्याचा मिळेल जर अधिकार
तरच वाटेल आम्हांला संतोष... {१}
 

भीक मागूनच भरावे लागते पोट
कारण मिळत नाही आम्हांस नोकरी
रेल्वे, बस, सिग्नल, रस्त्यावर फिरून
जन्मोजन्मी करावी लागते चाकरी... {२}
 

आम्हांला बघून वाजवती टाळ्या 
हिजडा, छक्का म्हणून हिणवती
घ्यायचे आहे नव्याने शिक्षण आता
यशाच्या दिशा सदोदित खुणवती... {३}
 

जरी तृतीयपंथी... आम्हांलाही जगू द्या
सार्वजनिक कार्यक्रमात नका डावलू
अर्धी स्त्री, अर्धा पुरूष असलो जरी
संधी दिल्यास प्रत्येक क्षेत्र सांभाळू... {४}
 

'तृतीयपंथीयांना शिक्षणाचा हक्क'
बघा सरकारने बनवला कायदा
आता दिवस आमचेही पालटतील 
नव्या कायद्याचा मिळेल फायदा... {५}
 

नटेश्वर शंकराची करते दुनिया पूजा
पण तृतीयपंथीयांच्या माथी अपमान
आम्हालांही मिळेल मोकळा श्वास
तेव्हाच होईल हिजड्यांचा सन्मान... {६}
 
 
 
 
 
 


1 comment: