छुपा हल्ला करणारे
भ्याड होते हल्लेखोर
जागेवर ठार केले
भारताचे पुत्र थोर..... [१]
पुलवामा जिल्ह्यामध्ये
घडवला बाॅम्बस्फोट
धूर, आग उठे लोट..... [२]
बेचाळीस वीरपुत्र
झाले जागीच शहीद
मरतांना दिला नारा
जयहिंद, जयहिंद..... [३]
असा सोन्याचा भारत
पार हादरून गेला
शूर, वीर जवानांचा
प्राण कंठातच नेला..... [४]
थोर शहिदांनी दिले
देशासाठी बलिदान
भारताच्या तिरंग्याला
सर्व देऊयात मान..... [५]
पाकिस्तानी संघटना
भ्याड ठरली शेवटी
भारताने उधळला
डाव दुष्टांचा कपटी..... [६]
सैनिकांना श्रद्धांजली
मान-वंदना देऊया
उगवत्या पिढीसाठी
त्यांचा आदर्श घेऊया..... [७]
No comments:
Post a Comment