जीवनाच्या या रंगमंचावर
जीवन नाट्य घडते कसे ?
अरे, तूच माणसा कलावंत
अन् प्रेक्षकही तूच असे..... [१]
जीवनरुपी या नाट्याचे
असतात तीन अंक
कुणी जन्मतो श्रीमंत
कुणी नशिबाने रंक..... [२]
पहिला अंक असतो
निरागस बालपणाचा
खेळणे, बोबडे बोलणे
तुरूतुरू चालण्याचा..... [३]
अंक दुसऱ्यात असतात
तुम्ही जोशीले तरूण
रक्त करते सळसळ
तरी चेहऱ्याने करूण..... [४]
तिसऱ्या अंकात असतात
तुम्ही म्हातारे, पिकलेले
जराजर्जर, कापऱ्या शरीराचे
वृद्ध परिस्थितीने पिडलेले..... [५]
या तीन अंकांनंतर मिळे
नवीन देह, नवीन जीवन
जगायचे असेल समाधानाने
सत्कृत्य करावीत आजीवन..... [६]
No comments:
Post a Comment