Tuesday, March 19, 2019

व्हावे भारत सुराज्य... India... Marathi Poem... Marathi Kavita... मराठी कविता...

 
जाऊ नये कामावर 
असे व्हावे कधीतरी
नको वारी लोकलची 
पैसे यावे थेट घरी... {१}
 

आई - बाबांना सांभाळू
आपणच जन्मभर
असे व्हावे कधीतरी
दुःख व्हावे कणभर... {२}
 

सारी गरीबी मिटावी
सुख यावे घरी दारी
प्रत्येकाला मिळो पैसा
असे व्हावे कधीतरी... {३}
 

दहशतवाद सरो
संपो सारा भ्रष्टाचार 
असे व्हावे कधीतरी
यावा आता शिष्टाचार... {४}
 

व्हावे भारत सुराज्य
निघो सोन्याचाच धूर
असे व्हावे कधीतरी
आनंदाचा वाहो पूर... {५}
 
 
 

No comments:

Post a Comment