कधी मिळे फूल । कधी रूते काटा ।
जीवनाच्या वाटा । बिकटच ॥
रस्तेही अरूंद । नागमोडी वाट ।
अवघड घाट । आयुष्याचा ॥
काम नित्य करू । मिळे मग फळ ।
सोसू थोडी कळ । यशासाठी ॥
मार्गस्थ होऊया । बाणा ही करारी ।
घेऊया भरारी । आनंदाने ॥
'उमा' सांगे तुम्हा । वाट दिसे स्पष्ट ।
करा थोडे कष्ट । सुखासाठी ॥
No comments:
Post a Comment