वसंतात करू
होलिकादहन
होळीच्या देवीला
गुलाबी, केशरी
पिवळा नि लाल
धुळवड आली
खेळूया गुलाल..... {२}
राधा आणि कृष्ण
जाहलेत दंग
आज खेळण्यास
या होळीचा रंग..... {३}
खेळतांना रंग
जरा ठेवा भान
इजा न होणार
याचे ठेवा ध्यान..... {४}
आपण साऱ्यांनी
बांधूयात चंग
वापरूया फक्त
नैसर्गिक रंग..... {५}
भरू पिचकारी
उडवूया पाणी
गाऊयात चला
स्नेहभावे गाणी..... {६}
यंदाच्या होळीत
सारे दुःख जाळू
सर्वांच्या स्नेहाने
प्रीतफुले माळू..... {७}
No comments:
Post a Comment