Friday, March 22, 2019

रंगांची उधळण... Colors... Marathi Poem... Marathi Kavita... मराठी कविता... Happy Holi...


रंगांची उधळण करत
आले पावन पर्व होळी
तूपाची धार धरून वरती
खाऊ गरम पुरणाची पोळी... {१}
 

कोणता रंग लावू सखे तुला ?
पिवळा, निळा, केशरी का लाल ?
कोणत्या रंगाने अजून खुलतील ?
तुझे गोरे - गोरे नाजूक गाल... {२}
 

भरून पिचकारी रंगीत पाण्याने
उडवू आपल्या सगळ्या मित्रांवर
विसरून सारे द्वेष, भांडणं, रूसवे
प्रेम करू चला आपल्या शत्रूंवर... {३}
 

गुलाबी, हिरवा, जांभळा, काळा
मुक्त हस्ताने रंगांची उधळण
वसंतात सण रंगपंचमीचा आला
करू सर्वांवर आनंदाची पखरण... {४}
 

गोपिका उधळतात गुलाल
कृष्णासोबत राधिकाही दंग
उडवून रंगीत पाण्याचे फवारे
वृंदावनात खेळतात सारे रंग... {५}
 

करू प्रतिज्ञा आजच्या दिवशी
नैसर्गिक रंगांनी होळी खेळूया
जल हेच तर आहे जीवन 
पाण्याचा अपव्यय टाळूया...  {६}
 
 
 
 

No comments:

Post a Comment