निसर्गाचे ऋतूचक्र
एक प्रेमळ वसंत
वसंताचे आगमन
आहे साऱ्यांना पसंत..... {१}
असा वसंत फुलला
नटे निसर्ग रंगीत
चला गाऊ सर्वजण
खुशी, आनंदाचे गीत..... {२}
जागे नवी प्रीत मनी
आला हा वसंतोत्सव
झाडे, पानांचा, वेलींचा
जणू नवा जन्मोत्सव..... {३}
रंग वसंताचे दिव्य
कशी मोहोरली सृष्टी
रंगारंग पसरला
मिळे तिला नवी दृष्टी..... {४}
आली बघा धुळवड
खेळू चला प्रेमरंग
श्याम आणि राधा दोघे
रंग खेळण्यात दंग..... {५}
कधी बेफिकीर राहू
कधी मस्तमौला जगू
रंग वसंताचे छान
नित्य खऱ्यानेच वागू..... {६}
No comments:
Post a Comment