चला चला सवंगड्यांनो
या रे या रे सर्व मित्रांनो
सर्व गंमत करू चला... (१)
लागली आता उन्हाळी सुट्टी
एकमेकांशी जमली रे गट्टी
लपाछपी, धावाधावी, कंचे
तुम्हीच तर माझे मित्र सच्चे... (२)
पत्ते, कॅरम आणि बुद्धिबळ
सोसवेना ऊन्हाची झळ
आंबा ,खरबूज, कलिंगड
चला फिरू किल्ले, गड... (३)
सुट्टीतील आनंद साजरा करू
खेळात जिंकू किंवा हरू
जिंकल्याने जर उंचावेल मान
हरल्याने सुटणार नाही भान... (४)
सुट्टीत जाऊ आपण फिरायला
नदीवर जाऊ रोज पोहायला
राजा, तनू, मीनू, छोटू, सरू
या सुट्टीत भरपूर मजा करू... (५)
No comments:
Post a Comment