Sunday, March 31, 2019

संयम... Control... Patience... Marathi Poem... Marathi Kavita... मराठी कविता...


मनाशी नित्य
साऱ्यांनी संयम बाळगावा
झरा झरावा
ममत्वाचा..... [१]
 

संयमाने आयुष्य
सुंदर, सरळ, छान
वाढेल मान
प्रत्येकाचा..... [२]
 

संयमाने येई
व्यक्तिमत्वात वेगळी झाक
होई संसारचाक
सुरळीत..... [३]
 

दोन घडीचे
आहे जरी जीवन
वागावे आजीवन
संयमाने..... [४]
 

पदरी शांतता
तुम्हांला संयमामुळे गवसेल
मनजोगते मिळेल
सदोदीत..... [५]
 
 
 
 

No comments:

Post a Comment