Sunday, March 31, 2019

निसर्गाचे असंतुलन... Natures Imbalance... Climate Change... Marathi Kavita... Marathi Poem... मराठी कविता...




फिरत होते कालचक्र नित्य 
होत होते दिवस आणि रात्र
युगामागुनी युगे जात होती
ऋतूंचे चालायचे नियमित सत्र... [१] 

पूर्वेला उगवतो दिनकर 
अंधारात दिसते चांदणे 
धरती कोरायची अंगावर 
पावसाची सुंदर गोंदणे... [२]

ऋतूमागूनी येत होते ऋतू
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा
सगे - सोयरे सर्वच आपले 
सर्वांशीच माणसाचा जिव्हाळा... [३]

उन्हाळ्यात होते ऊन खूप 
पावसाळ्यात बरस होत्या धारा 
हिवाळ्यात गोठायचे अंग 
सर्व ऋतूंत नित्य वाहायचा वारा... [४] 

वर्षभर अखंड चालत असे
हा नयनरम्य ऋतूंचा सोहळा 
सजायचा निसर्ग मनोहारी 
होता सृष्टीचा रंग वेगवेगळा... [५]

निसर्गाचे असंतुलन झाल्यामुळे
आता बदलती ऋतू क्षणाक्षणाला
पृथ्वीच्या तापमान वाढीची खंत
इथल्या प्रत्येक मनामनाला... [६]


No comments:

Post a Comment