झुंजूमुंजू झाल्यावर
नभी पसरली लाली
साऱ्या तरारल्या वेली... (१)
दवबिंदू तृणावर
भासे जणू मोती शुभ्र
सूर्य उगवल्यावर
झाले आकाश निरभ्र... (२)
घरट्यात चिऊताई
जागी झाली लवकर
गोळा झाले पक्षी सारे
गेले त्यांच्या कामावर... (३)
पावसाची सुरूवात
झाकोळता नभ सारे
रिमझिम श्रावणात
मुक्त वाहतात वारे... (४)
रात्री खेळतात खेळ
निळ्या नभाच्या प्रांगणी
मिळे ताऱ्यांची सोबत
धुंद चंद्रमा-चांदणी... (५)
No comments:
Post a Comment