चला आपण मिटवू तंटा आणि वाद
मकरसंक्रांतीला देऊ प्रेमाने साद ॥धृ॥
घ्या हो तिळगूळ आणि गोड-गोड बोला
रूसलेल्या हृदयाचे बंद कप्पे खोला
वाढवून सुख, दुःखाला करूया बाद ॥१॥
पतंग उडवण्यात मुले झाली दंग
मकरसंक्रांतीचा हा पसरला रंग
नातेसंबंधात घुमावा प्रीतीचा नाद ॥२॥
यशाच्या पतंगाने घ्यावी नभी भरारी
प्रगती होण्यासाठी बाणा ठेवू करारी
विकासाला देऊया सुविचारांची दाद ॥३॥
No comments:
Post a Comment