Friday, January 18, 2019

फळा-फुलांचे गाणे... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...


फळा-फुलांचे शिकूया गाणे
चला एकमेकांची जपूया मने
हापूस आंबा आहे फळांचा राजा
गोड आंबे खाण्याची खूपच मजा... {१}



लाल गुलाबाची वेगळीच शान
काटे टोचले तरी राजाचा मान
सफरचंदाच्या गाली चढली लाली
राहतो तो काश्मिरात धुक्याच्या महाली... {२}



पांढराशुभ्र मोगरा करतो नखरा
याच्या गजऱ्यावरती सर्वांच्या नजरा
गोल गोड गोड असतो चिकू
मुलांनो आपण खूप खूप शिकू... {३}



सूर्याकडे सदैव बघते असते सूर्यफूल
जपुनी ठेवा तुमच्यातले गोंडस मूल
हिरव्या फणसाचे पिवळे - पिवळे गरे
काटेरी असूनही वागतो खरे - खरे... {४}



लहान मुलांना केळी आवडतात खूप
आईने मारल्यावर बसतात चूप
जास्वंदाचे फूल लाल फार
गणपतीला वाहूया फुले चार ... {५}



आतून लाल, बाहेरून हिरवा
कलिंगडाचे गाणे गातो पारवा
रात्री सुगंधित फुलते रातराणी
किलबिल बालवाडीत गाऊया गाणी... {६}



झेंडूचे फूल वाहूया देवाला
सुखी ठेवूया आपल्या भावाला
स्ट्राॅबेरी दिसते लालचुटूक
आंबट-गोड चिंचेचे बुटूक... {७} 








No comments:

Post a Comment