Sunday, January 6, 2019

नाते युगायुगांतरीचे... मराठी कविता... Marathi Kavita... Marathi Poem...


आहे छान आपले नाते युगायुगांतरीचे
जसे भरजरी कापड मखमली जरीचे
मित्र-मैत्रिणी आहेत माझ्यासाठी खास
त्यांच्यातच तर वसतो माझा श्वास... {१}


कधी शांत, तर कधी रौद्र लाटा
सोबतीने चालूया जीवनाच्या वाटा
हातात शक्ती, बाणा आहे करारी
निष्ठेने घ्यावी आपण गगनी भरारी... {२}


आठवतात कट्ट्यावरच्या त्या गप्पा
हळव्या हृदयाचा खोललेला कप्पा
जपावे आपण युगायुगांतरीचे नाते
जसे हिरव्या तृणाचे लवलवते पाते... {३}


मित्रांसोबतच्या क्षणांना सुगंधी सुवास
मित्र-मैत्रिणींसोबत राहावे हाच ध्यास
आयुष्यभर मिळावी तुमची अखंड साथ
तुमच्याच साथीने व्हावी संकटावर मात... {४}


मित्र-मैत्रिणींना जपू काळीज कोंदणात
त्यांचेच नाव कोरले चंदेरी गोंदणात
युगायुगांतरी अशीच राहावी प्रीत
प्रत्येक टप्प्यावर मिळावी जीत... {५}
 
 
 

No comments:

Post a Comment