Sunday, January 13, 2019

मकरसंक्रांतीचा सण.. Makar sankranticha san... मराठी कविता... Marathi Kavita... Marathi Poem...


तिळगूळ घेऊन गोड-गोड बोलावे
माणसाला माणसांशी जोडावे
पतंग उडवण्यात मुले झाली दंग
घरोघरी मकरसंक्रांतीचा पसरला रंग... <१>

आवडे फारच संक्रांतीचा काटेरी हलवा
जुने वाद विसरून नातेसंबंध खुलवा
आला संक्रांतीचा अनोखा हा सण
सोबत्यांसोबत साऱ्या भारावले मन... <२>

थंडीत शेकोटी पेटवून ऊब घ्यावी
प्रेमाची गूळपापडी सर्वांना द्यावी
सूर्याचा मकर राशीत झाला प्रवेश
जोरदार थंडीचा संपला आवेश... <३>

सुगी येऊन ठेपली माझ्या या दारांत
आनंद निनादे सृष्टीच्या चराचरांत
उंच आभाळी उडावी यशाची पतंग
खरपूस भाकरीवर तीळ खमंग... <४>

तिळगूळ खाऊन गाऊयात गोडवे
नव्या सुनेला भेट देऊयात जोडवे
क्षणोक्षणी जीवनी मिळावी प्रीत
मकरसंक्रांतीला गाऊ आनंदाचे गीत... <५>



No comments:

Post a Comment