मला आज कळाला, नजरेचा इशारा

प्रेमाच्या संगीतात, धुंद वाहते हवा
प्रेमगूज सांगतो, हा पाखरांचा थवा
हळूवार स्पर्शाने, तनूवरी शहारा..... ॥१॥
मोहवे तुझी ऐट, आवडे तुझा तोरा
गुलाबी अक्षरांनी, भरे कागद कोरा
स्वप्नांवर नेहमी, राजसाचा पहारा..... ॥२॥
कोरूया नभावर, प्रीत जगावेगळी
अनोखे प्रेम माझे, बघे सृष्टी सगळी
आहे मजला आता, सख्या तुझा सहारा..... ॥३॥
No comments:
Post a Comment