Monday, January 21, 2019

महाराष्ट्रीयन शेकरू खारूताई... Shekaru Squirrel... Marathi Kavita... Marathi Poem...मराठी कविता


खारूताई, खारूताई
ये ना भर, भर, भर
मोठ्या-मोठ्या झाडांवर
चढू आपण सर, सर, सर... {१}
 

इटुकली-पिटुकली तू खार
शेपटी तुझी लांब, लांब, लांब
धावता-धावता येतो मी
तू जरा थांब, थांब, थांब... {२}
 

खारूताईचा राखाडी रंग
शेंगा खाते ती खूप, खूप, खूप
आईने मारल्यावर मला
मी बसतो चूप, चूप, चूप... {३}
 

खारूताई, मी तुझा भाऊ
तू माझी ताई, ताई, ताई
शाळेत गणित येत नाही तेव्हा
मारते मला बाई, बाई, बाई... {४}
 

खारूताईचे इवलेसे तोंड
तिचे मजबूत दात, दात, दात
धानाच्या शेतातला कोवळा
आवडे तिला भात, भात, भात... {५}
 

तिच्या छोट्याशा अंगावर
तपकिरी पट्टे, पट्टे, पट्टे
आईस्क्रीमचा हट्ट केल्यावर
बाबा देतात रट्टे, रट्टे, रट्टे... {६}
 

रामायणात खारूताईची
आहे मोठी शान, शान, शान
आपल्या महाराष्ट्राच्या शेकरूचा 
ठेवू आपण मान, मान, मान... {७}
 
 
 

No comments:

Post a Comment