माझ्या अंगणी
चिऊताईचे गाणे
नवे तराणे..... {१}
चिऊताईचे गाणे
नवे तराणे..... {१}
चंद्र प्रकाश
पसरला अंगणी
निळे आकाश..... {३}
भल्या पहाटे
दवबिंदूंचा सडा
तृणाच्या कडा..... {४}
रोज सकाळी
पक्ष्यांचा येतो थवा
वाहते हवा..... {५}
नाते जमले
साऱ्या पशु-पक्ष्यांशी
स्वप्न सजले..... {६}
खेळती खेळ
रोज माझ्या अंगणी
चंद्र-चांदणी..... {७}
No comments:
Post a Comment