Sunday, January 27, 2019

निवडणूक... मराठी कविता... Election... Marathi Kavita... Marathi Poem...


मतदारांना खाऊ-पिऊ घालून
हातात गूपचूप दिली जाते नोट
जो उमेदवार त्यांना नोट देतो
त्यालाच मिळतात मग वोट... {१}
 

कमळ, पंजा, हत्ती, सायकल
झाडू, इंजिन, कंदील, धनुष्य
निवडून आल्यानंतर पुढारी मात्र
खराब करतात जनतेचे आयुष्य... {२}

विकास करण्यासाठी द्यावी मतं
चांगल्यासाठी लढावी निवडणूक
आधी गोड-गोड बोलणाऱ्यांची
जिंकल्यानंतर बदलते वागणूक... {३}

खादीचा पांढरा कुर्ता, पायजमा
ढेरपोट्या पुढाऱ्यांचा न्याराच ढंग
सफेद खादी वापरूनही नेतेमंडळी
सरड्यासारखे रोज बदलतात रंग... {४}

महान लोकशाही राष्ट्र असूनही
आजही मागासलेला आहे भारत
प्रतिक्षा आहे बलाढ्य नेतृत्वाची
जो सुधारेल या भारताची पत... {५}


No comments:

Post a Comment