Monday, January 21, 2019

जात आणि जातीवाद... Caste and casteism... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...


स्वप्न माझे आहे विशाल
घेणार मी गगनी भरारी
मनगटात माझ्या बळ
आहे बाणा माझा करारी... {१}


जरी खालच्या जातीतली मी
रीतसर सर्व शिक्षण घेते
नोकरीसाठी मारते चकरा
जेव्हा जात आडवी येते... {२}


प्रियकराशी ठरणार होते लग्न
पण माझी जात नाकारली गेली
जेव्हा कळले आमच्या प्रेमाबद्दल
तेव्हा माझी जात आडवी आली... {३}


काही बोलायची सोय नाही
कसे दडपून टाकावे जातीला ?
कसे विसरून जावे मी ?
या माझ्या जन्मदात्या मातीला... {४}


घेतले कितीही शिक्षण जरी
तरी काय शिक्षणाचा फायदा ?
भारतात बदल घडेल तेव्हाच
जेव्हा बदलेल कायदा... {५}









No comments:

Post a Comment