Wednesday, January 30, 2019

महात्मा गांधी... Mahatma Gandhi... मराठी कविता... Marathi Kavita... Marathi Poem...


नमन स्वीकारा आमचे
बापू तुम्ही महात्मा
भारताच्या प्रगतीसाठी
तुमचा अमर आत्मा... {१}
 

'शांतीदूत' तुम्ही देशाचे
शांततेची केली कामना
सत्य, अहिंसेचा संदेश
जागवली स्वातंत्र्य भावना... {२}
 

नेसून सुती पंचा
हातात घेतली काठी
अन्याय मिटवण्यासाठी
लागले अहिंसेच्या पाठी... {३}
 

'खेड्यांकडे चला' हा मूलमंत्र
स्वच्छतेचा दिला संदेश
इंग्रज सत्तेला झुगारून
दिला 'चले जाव'चा आदेश... {४}
 

मोहनदास 'महात्मा' होऊन
या जगात झाले अमर
देशाच्या अस्तित्वासाठी
लढले स्वातंत्र्य समर... {५}
 
 
 

Tuesday, January 29, 2019

नैराश्य समजून घेताना... मराठी लेख... Depression...



              काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर एक व्हिडीओ पाहण्यात आला होता. त्यात असे सांगितले होते की, रात्री झोप लागण्यापूर्वीची 10 मिनिटे माणूस जे-जे विचार करतो, तेच विचार सकाळी उठल्यानंतर पूर्ण दिवसभर तो करत राहतो. म्हणजे, समजा माणसाने झोप लागण्यापूर्वीची 10 मिनिटे नकारात्मक विचार केला असेल, तर त्याच्या नव्या सकाळची सुरूवात नकारात्मक विचारानेच होते. एकदा का नकारात्मक विचाराने दिवस सुरू झाला, तर पूर्ण दिवसभर डोक्यात तेच विचार राहतात आणि रात्री झोप लागण्यापूर्वीची 10 मिनिटे सुद्धा ते विचार पाठ सोडत नाही.


             नकारात्मक विचार म्हणजे एखाद्या व्यसनासारखे असतात. ते व्यसन आपल्याला कधी लागलं हेच कळत नाही. जेव्हा कळतं, तोपर्यंत आपण त्यात पूर्णपणे अडकून गेलेलो असतो. वाईट सवयींतून चांगल्या सवयींकडे जाण्याचे मार्ग आहेतच. पण माणसाला ते कळायला हवेत. सर्वात आधी तर हे कळायला हवं की, आपण नैराश्याने घेरलेलो आहोत. एकदा का कळले, मग त्या नैराश्यावर मात करणे सोपे होते. नैराश्य हे कोणालाही येऊ शकतं. कोणालाही अगदी कोणालाही. बाॅलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री दिपिका पादुकोण सुद्धा नैराश्याची शिकार झाली होती. तिच्या आयुष्यात वैफल्यग्रस्तता इतक्या प्रमाणात भरली होती, की ती कोणते काम करते आहे, हेच तिला कळत नव्हते. शूटींग दरम्यान अचानक अश्रू येणं ती खुबीने लपवायची. या जगात आपलं कुणीच नाही असं वाटणं, एकटेपणाच्या भावनेने घेरणं, मरून जावंसं वाटणं या सर्व गोष्टींमधून ती सुद्धा गेली आहे. मग तिच्या आयुष्यात असं काय घडलं की, ती या सर्व गोष्टींमधून बाहेर पडू शकली ? याचे उत्तर आहे 'काउंन्सलिंग' म्हणजे 'समुपदेशन'. 
लोकं मानसोपचार तज्ञाकडे जायला घाबरतात. कारण, त्यांना वाटते की, आपण वेडे आहोत की काय?, लोकं काय म्हणतील ?, लोकांनी आपल्याला वेडं ठरवलं तर?  या बदनामीच्या भीतीमुळे मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेतला जात नाही. समुपदेशनाने फारसा फरक पडत नाही, असेही काही लोकांना वाटते. पण ते चुकीचे आहे. मानसोपचार तज्ञांनी दिलेल्या सकारात्मक विचारांचा नक्कीच फायदा होतो. माणसाच्या आयुष्यात नक्कीच बदल होतो. माणसाचे नकारात्मक विचार कात टाकतात आणि सकारात्मक विचार जीवनात यायला सुरूवात होते. सकारात्मक विचार ही यशाची पहिली पायरी आहे.


              कामाचा प्रचंड ताण असल्यामुळे अनेक मोठं-मोठ्या कलाकारांना नैराश्य येते. मोठ्या लोकांच्या बातम्या होतात, म्हणून आपल्याला कळते तरी. पण ज्या लोकांच्या बातम्या होत नाही, अशा सर्व सामान्य माणसाबद्दल कळणार तरी कसे ? सर्व सामान्य माणसाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास त्याच्या नातेवाईकांना सतर्क राहावे लागते. आपल्या आजूबाजूचा एखादा व्यक्ती सतत नकारात्मक बोलतो का ?, त्याला मरून जावेसे वाटते का ?, त्याचे मूड सतत बदलतात का?, आनंदाच्या प्रसंगी सुद्धा तो दुःखात असल्यासारखा वाटतो का ?, एखादा व्यक्ती लोकांमध्ये मिसळायला घाबरतो का ? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांमधून आपल्याला माहिती मिळू शकते. पण सगळ्यात आधी आपल्याला नैराश्य आलं आहे, हे कळणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.


               कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फुटायचं राहत नाही. चेहऱ्यावर कितीही हसू ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही नैराश्याची भावना जास्त वेळ लपू शकत नाही. मनातली चिंता कधी ना कधीतरी बाहेर येतेच. भावनांचा कधीतरी उद्रेक होतोच. आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवर लक्ष ठेवायला हवे. आपल्या स्वतःवर लक्ष ठेवायला हवे. कोणत्या व्यक्तीचं फेसबुक, व्हाॅटस् अपचे स्टेटस काय आहे, या वरूनही त्या व्यक्तीची मनःस्थिती कळते. सगळ्यात आधी आपण नैराश्यात आहोत, हे कळायला हवे. आपण नैराश्यात आहोत या भावनेला स्वीकारायला हवे, त्यानंतरच पुढे पाऊल टाकणे सोपे जाते.

India... Bharat... English Poem... English Kavita...





We salute to the Indian soldiers...
Because of them, we stay happy...
Soldiers do their duty on the border 
in very critical condition for saving our nation...
Respect every soldier...


Respect our country India...
Give proper respect to national flag Tiranga...
Be proud to be an Indian...
Jai Hind...


हमारे हो तुम... Hamare ho tum... हिंदी कविता... Hindi Poem... Hindi Kavita...


तेरे मेरे नैन
नैनोंसे जब लडे
बहुत सारे ख्वाब
मेरे मन में उमडे... <१>
 

सँवारू तेरी 
रेशमी जुल्फों को
या चूम लूं तेरे
गुलाबी गालोंको... <२>
 

तेरे पास आकर
छूं लूं तेरी रूह
तुझसे कभी भी
ना फेरू मुंह... <३>
 

मेरे सांसोंमे आज
तेरी सांसे घुल जाये
तुझे छूकर ऐसे
हम तुझे पाये... <४>
 

एक-दूसरे में
खो जाए हम
हम हैं तुम्हारे
हमारे हो तुम... <५>
 
 
 

Sunday, January 27, 2019

निवडणूक... मराठी कविता... Election... Marathi Kavita... Marathi Poem...


मतदारांना खाऊ-पिऊ घालून
हातात गूपचूप दिली जाते नोट
जो उमेदवार त्यांना नोट देतो
त्यालाच मिळतात मग वोट... {१}
 

कमळ, पंजा, हत्ती, सायकल
झाडू, इंजिन, कंदील, धनुष्य
निवडून आल्यानंतर पुढारी मात्र
खराब करतात जनतेचे आयुष्य... {२}

विकास करण्यासाठी द्यावी मतं
चांगल्यासाठी लढावी निवडणूक
आधी गोड-गोड बोलणाऱ्यांची
जिंकल्यानंतर बदलते वागणूक... {३}

खादीचा पांढरा कुर्ता, पायजमा
ढेरपोट्या पुढाऱ्यांचा न्याराच ढंग
सफेद खादी वापरूनही नेतेमंडळी
सरड्यासारखे रोज बदलतात रंग... {४}

महान लोकशाही राष्ट्र असूनही
आजही मागासलेला आहे भारत
प्रतिक्षा आहे बलाढ्य नेतृत्वाची
जो सुधारेल या भारताची पत... {५}


भारत... मराठी कविता... India... Marathi Kavita... Marathi Poem...


फडकतो तिरंगा भारताचा
देशाचा आम्हांला अभिमान
तुझ्यात वसे प्राण आमचा
तूच आहेस आमची शान... १
 

टिळा लावूनी या मातीचा
साजरा करूयात सण
आमचे तन-मन-धन
भारतमातेसाठी अर्पण... २
 

ज्यांनी भारत घडवला
धन्य त्या सर्वांचा पराक्रम
भारताला महासत्ता बनवून
रचला त्यांनी नवा विक्रम... ३
 

भारतवासीयांचे भले होवो
प्रत्येकाला मिळो समता
होऊनी कल्याण जनांचे
येथे सदैव नांदावी शांतता... ४
 

देशासाठी प्राण अर्पावे
अखंड व्हावी देशभक्ती
आम्ही जिंकवू या देशाला
भारत बनावा महान शक्ती... ५
 
 
 
 
 


Thursday, January 24, 2019

मिलनाची आस... मराठी कविता... Milanachi aas... Marathi Kavita... Marathi Poem...


गुलाबी थंडीत तनाला मोहवतो गारवा
सुमधुर कंठाने गोड गाणे गातो पारवा

हृदयाच्या कप्प्यामध्ये होत्या तुझ्या आठवणी
अश्रूंच्या रूपाने बाहेर पडल्या साठवणी

सप्तपदी संसाराची हातात घेऊन हात
सोबतीने देऊया आपण संकटाला मात

प्रियकराच्या मिलनाची लागली मला आस
म्हणूनच होतो सर्व ठिकाणी त्याचाच भास

ऊन-सावलीचा खेळ... मराठी कविता... Marathi Kavita... Marathi Poem...


विस्तीर्ण पसरले निळेशार आकाश खुले
या आभाळाच्या छताखाली गाणे गातात मुले
झाले कधी प्रेम तुझ्यावर मला ना कळले
असे कसे पाऊल माझे तुझ्याकडे वळले

जेव्हा कधी पाहावी वाटते मला सारी सृष्टी
सगळ्यात आधी जाते हिरवळीवर दृष्टी

नित्य खेळावा मी असा ऊन-सावलीचा खेळ
चंद्र आणि चांदणीच्या भेटण्याची झाली वेळ

शंख-शिंपले... मराठी कविता... Seashells... Marathi Kavita... Marathi Poem...


शंख-शिंपले
वेचती मुले सारी
रंगीत भारी.............. (१)


शंख-शिंपले
विस्तीर्ण सागरात
सापडतात.............(२)


बनवू माळा
शंख नि शिंपल्याच्या
घालूया गळा.................(३)


सागरी लाट
शंख-शिंपले आणे
अति वेगाने...................(४)


थेंब पडतो
स्वातीच्या नक्षत्रात
मोती बनतो..................(५)
 
 
 
 
 
 

Tuesday, January 22, 2019

तुम्हारे बिन... हिंदी कविता... Hindi Kavita... Hindi Poem...


ये आफ़ताब की रोशनी है
या तुम्हारे चेहरे का नूर...
 
समझ नहीं पा रहे है हम
किसने रोशन की ये शाम...
 
चाँद में दिखते हो तुम
मेरे चाँद हो तुम...
 
बंद करू आँखें तो ख़्वाब तुम्हारा
खोलूं लब तो नाम तुम्हारा...
 
तुम ही हो मेरा सहारा
तुम्हारे बिन ना ज़ीना गँवारा...
 
 
 

Monday, January 21, 2019

Oxygen... English Poem...






Oxygen is very important for us...
For all human beings or animals...
Oxygen is our lifeblood...

Pure oxygen is not easily available now a day's...
The cities are very polluted...
Pollution is everywhere...
No pure air is available...
Plant trees for pure air...

Due to deforestation, there is a huge loss in trees...
Concretisation changes the whole structure of the system...
Nature donates plenty of things to us...
But, Man is a greedy animal...
He only takes from nature, destroys nature for fulfilling his demands...




प्रजासत्ताक भारत...??? मराठी कविता... Marathi Kavita... Marathi Poem...


गुलामगिरीतून केव्हाच
स्वतंत्र झाला भारत
राजकारण्यांनी केली
देशाची दुर्दैवी गत..... {१}
 

निर्भयाला अजूनही
मिळाला नाही न्याय
आजही स्त्री सोसते
कुटुंबाचा अन्याय..... {२}
 

भारतीय लोकांची 
मनेच आहेत लहान
सांगा कसे बोलावे ?
माझा भारत महान..... {३}
 

कोणे एकेकाळी भारतातून
सोन्याचा निघत होता धूर
जर आज डोकावून बघितले 
तर दिसतो अंधश्रद्धेचा पूर..... {४}
 

कधी बदलेल हे चित्र ?
कधी थांबेल भ्रष्टाचार ?
माणूस म्हणून वागण्याचा
कधी येईल शिष्टाचार ?..... {५}
 

प्रजासत्ताक भारत झाला तरी
जनतेला नाही अधिकार
झुगारून खोटे प्रकार सारे
कधी होईल खऱ्याचा स्वीकार ?..... {६}
 
 
 

महाराष्ट्रीयन शेकरू खारूताई... Shekaru Squirrel... Marathi Kavita... Marathi Poem...मराठी कविता


खारूताई, खारूताई
ये ना भर, भर, भर
मोठ्या-मोठ्या झाडांवर
चढू आपण सर, सर, सर... {१}
 

इटुकली-पिटुकली तू खार
शेपटी तुझी लांब, लांब, लांब
धावता-धावता येतो मी
तू जरा थांब, थांब, थांब... {२}
 

खारूताईचा राखाडी रंग
शेंगा खाते ती खूप, खूप, खूप
आईने मारल्यावर मला
मी बसतो चूप, चूप, चूप... {३}
 

खारूताई, मी तुझा भाऊ
तू माझी ताई, ताई, ताई
शाळेत गणित येत नाही तेव्हा
मारते मला बाई, बाई, बाई... {४}
 

खारूताईचे इवलेसे तोंड
तिचे मजबूत दात, दात, दात
धानाच्या शेतातला कोवळा
आवडे तिला भात, भात, भात... {५}
 

तिच्या छोट्याशा अंगावर
तपकिरी पट्टे, पट्टे, पट्टे
आईस्क्रीमचा हट्ट केल्यावर
बाबा देतात रट्टे, रट्टे, रट्टे... {६}
 

रामायणात खारूताईची
आहे मोठी शान, शान, शान
आपल्या महाराष्ट्राच्या शेकरूचा 
ठेवू आपण मान, मान, मान... {७}
 
 
 

जात आणि जातीवाद... Caste and casteism... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...


स्वप्न माझे आहे विशाल
घेणार मी गगनी भरारी
मनगटात माझ्या बळ
आहे बाणा माझा करारी... {१}


जरी खालच्या जातीतली मी
रीतसर सर्व शिक्षण घेते
नोकरीसाठी मारते चकरा
जेव्हा जात आडवी येते... {२}


प्रियकराशी ठरणार होते लग्न
पण माझी जात नाकारली गेली
जेव्हा कळले आमच्या प्रेमाबद्दल
तेव्हा माझी जात आडवी आली... {३}


काही बोलायची सोय नाही
कसे दडपून टाकावे जातीला ?
कसे विसरून जावे मी ?
या माझ्या जन्मदात्या मातीला... {४}


घेतले कितीही शिक्षण जरी
तरी काय शिक्षणाचा फायदा ?
भारतात बदल घडेल तेव्हाच
जेव्हा बदलेल कायदा... {५}









Friday, January 18, 2019

फळा-फुलांचे गाणे... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...


फळा-फुलांचे शिकूया गाणे
चला एकमेकांची जपूया मने
हापूस आंबा आहे फळांचा राजा
गोड आंबे खाण्याची खूपच मजा... {१}



लाल गुलाबाची वेगळीच शान
काटे टोचले तरी राजाचा मान
सफरचंदाच्या गाली चढली लाली
राहतो तो काश्मिरात धुक्याच्या महाली... {२}



पांढराशुभ्र मोगरा करतो नखरा
याच्या गजऱ्यावरती सर्वांच्या नजरा
गोल गोड गोड असतो चिकू
मुलांनो आपण खूप खूप शिकू... {३}



सूर्याकडे सदैव बघते असते सूर्यफूल
जपुनी ठेवा तुमच्यातले गोंडस मूल
हिरव्या फणसाचे पिवळे - पिवळे गरे
काटेरी असूनही वागतो खरे - खरे... {४}



लहान मुलांना केळी आवडतात खूप
आईने मारल्यावर बसतात चूप
जास्वंदाचे फूल लाल फार
गणपतीला वाहूया फुले चार ... {५}



आतून लाल, बाहेरून हिरवा
कलिंगडाचे गाणे गातो पारवा
रात्री सुगंधित फुलते रातराणी
किलबिल बालवाडीत गाऊया गाणी... {६}



झेंडूचे फूल वाहूया देवाला
सुखी ठेवूया आपल्या भावाला
स्ट्राॅबेरी दिसते लालचुटूक
आंबट-गोड चिंचेचे बुटूक... {७} 








प्रेम... Love... मराठी कविता... Marathi Poem... Marathi Kavita...



मला आज कळाला, नजरेचा इशारा
नदीला गवसला, सागराचा किनारा..... ॥धृ॥


प्रेमाच्या संगीतात, धुंद वाहते हवा
प्रेमगूज सांगतो, हा पाखरांचा थवा
हळूवार स्पर्शाने, तनूवरी शहारा..... ॥१॥


मोहवे तुझी ऐट, आवडे तुझा तोरा
गुलाबी अक्षरांनी, भरे कागद कोरा
स्वप्नांवर नेहमी, राजसाचा पहारा..... ॥२॥


कोरूया नभावर, प्रीत जगावेगळी
अनोखे प्रेम माझे, बघे सृष्टी सगळी
आहे मजला आता, सख्या तुझा सहारा..... ॥३॥





Thursday, January 17, 2019

तुटलेली पतंग... मराठी कविता... Marathi Kavita... Marathi Poem...


काय होईल या पतंगाचे ?
कुठे जाईल ही तुटलेली पतंग ?
रंगीबेरंगी आयुष्य होते तिचे
पण आता झाले सर्वच बेरंग... १
 

रोज रस्त्यावर कितीतरी
पसरती तुटलेल्या पतंगी
दोर कापता तुटल्या त्या
रंगल्या ना कोणत्या रंगी... २
 

आकाशात भरारी घेत असतांना
कोणीतरी अचानक कापला दोर
कळेना कसा अन् केव्हा लागला ?
बिचाऱ्यांच्या नाजूक जीवाला घोर... ३
 

गुलाबी, पिवळ्या, लाल, आकाशी
रंगीबेरंगी पतंगांचे रंग हजार
पण एकदा तुटल्यानंतर मात्र
पतंगी दिसू लागतात बेजार... ४
 

पतंग उंच उडत असतांना
गळ्याभोवती मांजा आवळला
उगवण्याआधीच असा कसा
नभीचा नवा सूर्य मावळला... ५
 

पावसात लुप्त होतात 
फाटून होतात जीर्ण
मातीत जातात मिसळून
पतंगी दिसतात विदीर्ण... ६
 
 
 

Tuesday, January 15, 2019

तिळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला... मराठी कविता... Makar sankrant... Marathi Poem... Maearthi Kavita..


चला आपण मिटवू तंटा आणि वाद
मकरसंक्रांतीला देऊ प्रेमाने साद ॥धृ॥
 

घ्या हो तिळगूळ आणि गोड-गोड बोला
रूसलेल्या हृदयाचे बंद कप्पे खोला
वाढवून सुख, दुःखाला करूया बाद ॥१॥
 

पतंग उडवण्यात मुले झाली दंग
मकरसंक्रांतीचा हा पसरला रंग
नातेसंबंधात घुमावा प्रीतीचा नाद ॥२॥
 

यशाच्या पतंगाने घ्यावी नभी भरारी
प्रगती होण्यासाठी बाणा ठेवू करारी
विकासाला देऊया सुविचारांची दाद ॥३॥
 
 
 
 
 
 


Fresh Morning... English Poem...


How beautiful the new morning is...!
Red color spreads on blue sky before dawning...
Then sun come up from clouds... Slowly Slowly...


Sun rises fully...
Morning sky looks very wonderful...
Birds chirping...
Wind flows...


First ray of sun fall on tree, then trees flourishes... vines flourishes...
The nature is our guide... It teaches us... 
We must have to greet morning sun...
Awesome joy in morning...






तुम्हारी यादें... हिंदी कविता... Your Memories... Hindi Kavita... Hindi Poem...



तेरे मेरे बीच में रहता क्यूं है अंतर
फिर भी मेरी चाहत तुम ही हो निरंतर...
 

मुझे तुम्हारी तरफ खिंचती कोई डोर
यूं ही नहीं चला आता मैं तुम्हारीं ओर... 
 

किये थे कितने वादे, तुम सारे भूल गई
क्यूं हमारी मोहब्बत पानी में धूल गई ?... 
 

चला आया था तुम्हारे पास, तुम थीं नहीं
ढुंढा तुम्हें कई ओर, तुम दिखी नहीं कहीं... 
 

क्यूं किये थे वादे, क्यूं लडाऐ थे नैन
क्यूं चुराया था तुमने मेरी रातों का चैन...  
 

रोता हूं याद आती तुम्हारी हर बातमें
मुझे तनहा छोड दिया भरी बरसातमें...
 
 
 









बाप... ( अभंग रचना ) Father... Marathi Abhang Marathi Kavita Marathi Poem



बाप हाच देव । मायेचा सागर ।
प्रेमाचे आगर । माझ्यासाठी... ॥१॥


पकडले बोट । तात माझा गुरू ।
आयुष्य हे सुरू । बापामुळे... ॥२॥


अगाध कष्टाची । बापाची पुण्याई ।
होऊ उतराई । जन्मभर... ॥३॥


शेतकरी बाप । शेतात कष्टतो ।
देह झिजवतो । चंदनाचा... ॥४॥


फुलले शिवार । अपार कष्टाने ।
ताटात मिष्टान्ने । त्याच्यामुळे... ॥५॥


मान देऊ त्याला । पाय त्याचे धरू ।
सदोदीत स्मरू । शिकवण... ॥६॥


करते प्रार्थना । रोज मी देवाला ।
आनंदी बापाला । ठेवावेस... ॥७॥





Sunday, January 13, 2019

नभ... मराठी कविता... Sky... Marathi Kavita... Marathi Poem...


झुंजूमुंजू झाल्यावर 
नभी पसरली लाली
दूर झटकून क्षीण
साऱ्या तरारल्या वेली... (१)
 

दवबिंदू तृणावर
भासे जणू मोती शुभ्र
सूर्य उगवल्यावर
झाले आकाश निरभ्र... (२)
 

घरट्यात चिऊताई
जागी झाली लवकर
गोळा झाले पक्षी सारे
गेले त्यांच्या कामावर... (३)
 

पावसाची सुरूवात
झाकोळता नभ सारे
रिमझिम श्रावणात
मुक्त वाहतात वारे... (४)
 

रात्री खेळतात खेळ
निळ्या नभाच्या प्रांगणी
मिळे ताऱ्यांची सोबत
धुंद चंद्रमा-चांदणी... (५)
 
 
 

मकरसंक्रांतीचा सण.. Makar sankranticha san... मराठी कविता... Marathi Kavita... Marathi Poem...


तिळगूळ घेऊन गोड-गोड बोलावे
माणसाला माणसांशी जोडावे
पतंग उडवण्यात मुले झाली दंग
घरोघरी मकरसंक्रांतीचा पसरला रंग... <१>

आवडे फारच संक्रांतीचा काटेरी हलवा
जुने वाद विसरून नातेसंबंध खुलवा
आला संक्रांतीचा अनोखा हा सण
सोबत्यांसोबत साऱ्या भारावले मन... <२>

थंडीत शेकोटी पेटवून ऊब घ्यावी
प्रेमाची गूळपापडी सर्वांना द्यावी
सूर्याचा मकर राशीत झाला प्रवेश
जोरदार थंडीचा संपला आवेश... <३>

सुगी येऊन ठेपली माझ्या या दारांत
आनंद निनादे सृष्टीच्या चराचरांत
उंच आभाळी उडावी यशाची पतंग
खरपूस भाकरीवर तीळ खमंग... <४>

तिळगूळ खाऊन गाऊयात गोडवे
नव्या सुनेला भेट देऊयात जोडवे
क्षणोक्षणी जीवनी मिळावी प्रीत
मकरसंक्रांतीला गाऊ आनंदाचे गीत... <५>



Saturday, January 12, 2019

राजमाता जिजाऊ... मराठी कविता... Rajmata Jijau... Marathi Kavita... Marathi Poem...


पूजनीय, थोर, महान जिजाऊ माता
जाधवांची शूर लेक, संकटांची त्राता ॥धृ॥


बलाढ्य ती सिंहीण, शिवबा तिचा छावा
हाणून पाडला त्याने दुश्मनांचा कावा
सावली देई अनाथा, याचकांची दाता ॥१॥


भक्कम लाल महालाची निर्मिती केली
स्मरणात जिजाऊ, जरी सोडुनी गेली
प्रत्येकीच्या अंगी भिनवावे शौर्य आता ॥२॥


या मुलींनो वारसा तिचा पुढे नेऊया
त्या वीरांगनेला मानवंदना देऊया
धन्य जाहलो आम्ही, तिचे हे गीत गाता ॥३॥






Friday, January 11, 2019

जिजाऊंचा जयजयकार... मराठी कविता Jijauncha Jayjaykar Marathi Kaviata Marathi Poem


करतो तुझा जयजयकार
जय जय जिजाबाई
थोर तुझी गं पुण्याई
तू शिवबाची आई.... ।।१।।



लखूजी जाधवांच्या घराण्यात
श्रीमंतीत जिजाबाई जन्मली
शहाजी राजाशी सोयरीक
जुळवून लग्नगाठ बांधली... ।।२।।



१६३० या वर्षामध्ये
१९ फेब्रुवारीच्या रोजी
तुझ्या पोटी पुत्र जन्मला
नाव ठेवले त्याचे शिवाजी... ।।३।।



उपकार तुझे जिजाऊ अनंत
लाल महालाची केलीस निर्मिती
तुझ्या डोळ्यांत दिसे नेहमी
सुव्यवस्थित स्वराज्याची आकृती... ।।४।।



शिवबाला सांगितल्या नेहमी
तू थोर पराक्रमाच्या कथा
त्यामुळे घडला वीर शिवाजी
तुझ्या चरणी टेकवतो माथा... ।।५।।



जिजाऊ बलाढ्य सिंहीण
शिवबा तुझा छावा
संकटकाली आठवते तू
करतो आम्ही तुझा धावा... ।।६।।



धन्य तो तुझा शिवबा
तुझी नेहमी मानायचा आज्ञा
रायरेश्वराच्या मंदिरात केली
स्वराज्य निर्मितीची  प्रतिज्ञा... ।।७।।



तोरणा जिंकून शिवरायाने
तोरण बांधले स्वराज्याचे
बघितले स्वप्न नेहमी तू
मराठ्यांच्या प्रभावी साम्राज्याचे... ।।८।।



अफजलखानाचा करूनी वध
शायिस्तेखानाची छाटूनी बोटे
आमचा राजा आहे शिवराय
म्हणुनी आमचे भाग्य मोठे... ।।९।।



वीर शिवाजी झाला राजा
शिवाजीचा राज्यभिषेक सोहळा
पाहिला जिजाऊ मातेने
याचि देही, याचि डोळा... ।।१०।।



देह त्यागुनी जरी निघाली
किर्ती दरवळते आसमंतात
तुझी थोरवी गातो आम्ही
सदैव आहेस तू स्मरणात... ।।११।।



जिजाऊ थोर तुझी किर्ती
तू होतीस महान आई
निरंतर गातो तुझे गोडवे
अनंत आहे तुझी पुण्याई... ।।१२।।








कामवाली बाई... मराठी कविता... Kamvali Bai... Marathi Kavita... Marathi Poem...


आपण म्हणतो तिला, कामवाली बाई
पोट भरण्या कष्टते लेकरांची आई ॥धृ॥

सकाळी नऊलाच बरोबर हजर
खाली मान घालून कामावर नजर
काम करून परतायची तिला घाई ॥१॥

कपडे, भांडी, केर काढणे तिचे काम
सर्व करूनही येत नाही तिला घाम
मायेने लेकरांना सांभाळते ती दाई ॥२॥

तिला करूया आपण प्रणाम सादर
ओटी भरून मानाची करूया आदर
तिला सदैव सुखी ठेव तू, बाबा साई ॥३॥

Wednesday, January 9, 2019

आठवणीत आहे... मराठी कविता... Aathavanit ahe... Marathi Poem... Marathi Kavita...


आठवणीत आहे, तो चेहरा हासरा
आवडतो सुंदर, तो मुखडा लाजरा ॥धृ॥
 

जीवनात माझिया, वाजू लागे संगीत
रंगहीन आयुष्य, आता झाले रंगीत
श्रावण कोसळला, रिमझिम नाचरा ॥१॥
 

चंचला ती देखणी, तिचे नाजूक मन
भुललो रूपावर, तिला अर्पिले तन
प्रीतीत तिच्यासाठी, मी जाहलो बावरा ॥२॥
 

अंधारल्या त्या रात्री, जात होतो रानात
गूज प्रेमभरले, दिला हातात हात
रोज होई जीवनी, नवा क्षण साजरा ॥३॥
 


Monday, January 7, 2019

ढेरपोटे पुढारी... ढेरपोटे पुढारी... Politicians... Marathi Kavita... Marathi Poem...


पुढारी म्हणतात,
आम्हालाच निवडा यंदा 
न्याराच धंदा 
राजकारण्यांचा... {१}
 

सत्तेसाठी पुढारी
पडू लागले पाया
अगडबंब काया
वाकेना... {२}
 

गरीबाकडे जाऊन
देतात पाचशेची नोट
त्यांनाच वोट
मिळण्यासाठी... {३} 


बदलती रंग
सारे काही सत्तेसाठी
मोठ्या खुर्चीसाठी
हव्यासापायी... {४}
 

ढेरपोटे पुढारी
पार्टी देऊन शेतात
लाच देतात
मतदारांना... {५}
 

भुलवते सगळ्यांना
हे सत्तेचे गाजर
बसता ठोकर
आपटतात... {६}
 

मायावती, राहुल
ममता, अखिलेश, केजरीवाल
करतात हाल
सामान्यांचे... {७}
 

मिळावी खुर्ची
म्हणून देतात आश्वासने
प्रदूषित मने
पुढाऱ्यांची... {८}
 
 
 
 
 
 

Sunday, January 6, 2019

मनातली प्रीत... मराठी कविता... Manatali Preet... Marathi Kavita... Marathi Poem...


आला आयुष्यात
असा एक क्षण
राजसा आल्याने
भारावले मन..... {१}
 

सुंदर जीवन
झाले माझे पुन्हा
तुझ्याशी प्रेमाचा
करते मी गुन्हा..... {२}
 

जपते नेहमी
मनात मी प्रीत
हीच आहे माझी 
जगण्याची रीत..... {३}
 

प्राणप्रिय सख्या
स्वीकारले तुला
सदैव साथीचे
वचन दे मला..... {४}
 

आला एक क्षण
गंधाळली रात्र
तुझ्या मिलनाने
सुखावली गात्र..... {५}
 

तुझे-माझे प्रेम
सदा बहरावे
तुझ्या सोबतीने
आयुष्य सजावे..... {६}
 
 

नाते युगायुगांतरीचे... मराठी कविता... Marathi Kavita... Marathi Poem...


आहे छान आपले नाते युगायुगांतरीचे
जसे भरजरी कापड मखमली जरीचे
मित्र-मैत्रिणी आहेत माझ्यासाठी खास
त्यांच्यातच तर वसतो माझा श्वास... {१}


कधी शांत, तर कधी रौद्र लाटा
सोबतीने चालूया जीवनाच्या वाटा
हातात शक्ती, बाणा आहे करारी
निष्ठेने घ्यावी आपण गगनी भरारी... {२}


आठवतात कट्ट्यावरच्या त्या गप्पा
हळव्या हृदयाचा खोललेला कप्पा
जपावे आपण युगायुगांतरीचे नाते
जसे हिरव्या तृणाचे लवलवते पाते... {३}


मित्रांसोबतच्या क्षणांना सुगंधी सुवास
मित्र-मैत्रिणींसोबत राहावे हाच ध्यास
आयुष्यभर मिळावी तुमची अखंड साथ
तुमच्याच साथीने व्हावी संकटावर मात... {४}


मित्र-मैत्रिणींना जपू काळीज कोंदणात
त्यांचेच नाव कोरले चंदेरी गोंदणात
युगायुगांतरी अशीच राहावी प्रीत
प्रत्येक टप्प्यावर मिळावी जीत... {५}
 
 
 

मदतीचा हात... मराठी कविता... Marathi Kavita... Marathi Poem...


वाचवूया जीव 
   आपण प्रत्येक अपघातग्रस्ताचा
      प्राण संकटग्रस्ताचा 
         अनमोल..... {१}
 

महान कार्य
   जखमींना देऊ जीवदान
      करूया रक्तदान
         अपघातग्रस्ताला..... {२}
 

बोलवावी रूग्णवाहिका
    चला लवकरात लवकर
       असावे तत्पर
          मदतीला..... {३}
 

प्रथमोपचार करूनी
   देऊया कृत्रिम श्वासोच्छवास
      वाचवेल श्वास
        सजीवाचा..... {४}
 

पोलिसांना बोलावून
    अपघातस्थळी मदत करूया
       हात देऊया 
          सहकार्याचा..... {५}
 
 

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मराठी कविता Marathi Poem Savitribai phule Marathi Kavita


महान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
मुलींसाठी शिक्षणाचे दार केले खुले ॥धृ॥
 

भिडे वाड्यामध्ये काढली पहिली शाळा
शिक्षणाची ओढ दाखवतो फळा काळा
त्या सावित्रीचे कौतुक गातो आम्ही मुले ॥१॥
 

सोसले तिने फेकलेले दगड, गारा
तिच्याने आसमंत दरवळतो सारा
सावित्रीबाईंच्या कर्तृत्वाला जग भुले ॥२॥
 

आम्ही लेकी तुझ्या गं, तूच आमची आई
त्रिभुवनात नाव गाजे सावित्रीबाई
स्वकर्तृत्वाने स्त्री गगनी बांधते झुले ॥३॥
 
 


Thursday, January 3, 2019

सावित्रीबाई फुले... मराठी कविता... Savitribai Phule... Marathi Poem... Marathi Kavita...


फुलेंची तू सून | पत्नी ज्योतिबाची |
आई या जगाची | तू सावित्री ||..... (1)



सोसल्यास सदा | अंधारल्या राती |    

नशिबात माती | सदैवच ||..... (2)


फेकले लोकांनी | तुझ्यावर शेण |
घेतलीस घाण | अंगावर ||..... (3)



सुरू केली तूच | शाळा मुलींसाठी |
ही शिकण्यासाठी | पहिल्यांदा ||..... (4)



सावित्री तू सोसे | दगड नि धोंडे |
रोवलेस झेंडे | शिक्षणाचे ||..... (5)



घेऊया शिक्षण | होऊया साक्षर |
लिहूया अक्षर | अ आ इ ई ||..... (6)



गिरवू आम्ही गं | शिक्षणाचे धडे |
कलंक हा झडे | दुर्बुद्धीचा ||..... (7)



दिलेस तू आम्हां | हे विद्येचे ज्ञान |
झाल्यात सज्ञान | लेकी तुझ्या ||..... (8)



सावित्रीच्या लेकी | घेऊया भरारी |
बाणा हा करारी | ध्येयासाठी ||..... (9)



जयजयकार | सावित्रीचा करू |
नेहमीच स्मरू | शिकवण ||..... (10)