तुझे माझ्यावर प्रेम असूनही
मला ते कधी नाही जाणवले
मला दूर गेलेलं बघितल्यावर
पत्ता-बित्ता तुझा काय आहे
हे मला नव्हते काही ठावूक
मी रडायची तेव्हा मात्र
तू ही व्हायचास भावूक..... ॥२॥
असे कितीतरी क्षण राया
यायचे आणि फक्त जायचे
का माझे मन तुझ्याकडे
कधीही मात्र नाही न्यायचे..... ॥३॥
एकदा हिंमत करून तू सांगितली,
तुझ्या मनातील माझ्याबद्दल प्रीती
मला मात्र वागावे लागले, प्रियकरा
नेहमीच सांभाळून ही जनरीती..... ॥४॥
माझे लग्न झाले असूनही
मी तुझ्यावर प्रेम कसे करणार ?
माझ्या जोडीदाराचा हात सोडून
तुझा हात कसा धरणार ?..... ॥५॥
तुला सत्य सांगिल्यावरही
ते कधीच नाही पटले
त्यानंतर आपल्या नात्याबद्दल
मलाच खूप वाईट वाटले..... ॥६॥
हे माझ्या अनामिक प्रियकरा,
ही एक कविता तुझ्यासाठी
तुझ्या-माझ्यातल्या सुंदर, गोड
हळव्या प्रेमाच्या नात्यासाठी..... ॥७॥
No comments:
Post a Comment