Tuesday, May 14, 2019

शालू हिरवा... Greenary... Marathi Kavita... Marathi Poem... Haiku... मराठी कविता...


धरती झाली
पाण्याला कासावीस
लागली आस..... <१>

  
कोंब फुटला
मातीच्या गर्भामध्ये
नवा जन्मला..... <२>


शालू हिरवा 
पांघरला भुईने
नाचे पारवा..... <३>


सुगीच्या वेळी
धान्य येते घरात
मोद दारात..... <४>


घर भरले
शेतकऱ्याला हर्ष
त्रास सरले..... <५>

No comments:

Post a Comment