Thursday, May 16, 2019

महागाई... Inflation... Marathi Poem... Marathi Kavita... मराठी कविता....


किंमती वाढल्यात फार
जनता झाली बेजार
काय करावे आता 
कोणता हा आजार ?..... ॥१॥

खर्चाला नाही तोटा
पैसा ही झाला खोटा
लोकांच्या या राज्यात
रंग बदलतात नोटा..... ॥२॥

शासन भित्री भागूबाई
किती वाढवते महागाई
बघा कशी रयतेची
सुरू झाली डबघाई..... ॥३॥

सामान्य ठरलेत वेडे
प्रयत्न करावेत थोडे
कमी करून दाम
सोडवावे सारे कोडे..... ॥४॥

सरकार आहे हट्टी
सामान्यांशी घेते कट्टी
अशी या महागाईची 
रात्रंदिवस पेटते भट्टी..... ॥५॥



No comments:

Post a Comment