साजणी माझी... मराठी कविता... My Love... My Wife... Marathi Poem... Marathi Kavita...
आयुष्यात प्रवेशली
मंगल पावले तुझी
साजणी माझी
संसारी... ॥१॥
जीवनी आलीस
भितींना बनवले घर
सेवेला सदर
रात्रंदिन... ॥२॥
सखे, साजणी
तुझ्यावर माझी प्रीत
सांभाळू जनरीत
आनंदाने... ॥३॥
मंगल पावले
चालती सुखाचा सोहळा
आनंद वेगळा
अवर्णनीय... ॥४॥
जीवनी दरवळो
तुझ्या प्रेमाचा सुवास
हवा सहवास
आयुष्यभर... ॥५॥
No comments:
Post a Comment