Sunday, May 12, 2019

न ऋण जन्मदेचे फिटे... Aai... Mother... माय जननी... मराठी कविता Marathi POem Marathi Poem


जन्म कितीही घेतले
ऋण नाही फिटणार
माया आईची कधी ना
बाळासाठी आटणार... ॥१॥
 

वटवृक्ष आधाराचा
आई तूच माझी गुरू
जन्म झाला तिच्यामुळे
झाले आयुष्यही सुरू.... ॥२॥
 

माया समान सर्वांना
असो थोर वा लहान
आहे अवघ्या सृष्टीत
आई एकच महान... ॥३॥
 

लेकराच्या सुखासाठी
माय शिवारी राबते
शेतातून आल्यावर
ठेचा, भाकरी रांधते... ॥४॥
 

स्वतः उपाशी राहून
बाळा घास देई मुखी
देवा, अशा जननीला
नित्य ठेवावेस सुखी... ॥५॥
 

इच्छा एकच मनात
पुन्हा यावे तुझ्या पोटी
पाया पडून आनंदाने
तुझी भरावी मी ओटी... ॥६॥
 
 
 
 
 


No comments:

Post a Comment