Wednesday, February 6, 2019

रमाबाई भीमराव आंबेडकर मराठी कविता Ramabai Bhimrao Ambedkar marathi Poem Marathi Kavita



जगात कीर्तिवान दीन-दलितांची आई 
सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई... ॥धृ॥


भिमरावांच्या कार्यात दिला मदतीचा हात
केली हिंमतीने प्रत्येक संकटांवर मात
पुण्यवान, धैर्यशील, हिंमतवान बाई
सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई... ॥१॥
 

तळा-गाळातील गरीबांच्या रक्षणासाठी
पेटवून तेजस्वी मशाल शिक्षणासाठी
नष्ट केली अंधाऱ्या अज्ञानाची खाई
सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई ... ॥२॥
 

दलितांच्या उद्धारासाठी झिजवली काया
त्यांची काळजी घेऊन दिली अखंड माया
अमर आहे दुनियेत रमाबाईची पुण्याई
सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई... ॥३॥
 

दीन-दुबळ्यांच्या न्यायासाठी केला संघर्ष
फुलविले त्यांच्या चेहऱ्यावर सुखाचे हर्ष
भिम झाला बाप, रमा झाली अंगाई
सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई... ॥४॥
 

आम्हांला दाखवली समतेची वाट
आणली आयुष्यात क्रांतीची लाट
तुझ्या कार्याचे होऊ कसे उतराई ?
सर्वांना पूज्य आहे ती महान रमाई... ॥५॥
 
 



16 comments:

  1. खूप मार्मिक लिखाण. जयभीम.

    ReplyDelete
  2. अप्रतिम... खूप छान पद्धतीने वर्णन करून काव्यात मांडले आहे...👍👌🙏

    ReplyDelete
  3. Khup Chan MAnacha Jay Bhim Jay Rami

    ReplyDelete
  4. खूप छान. जय भीम

    ReplyDelete
  5. Khupppp chan
    जय भीम 🙏
    नामो बुद्धाय 🙏

    ReplyDelete
  6. अप्रतिम कविता सादर केली. मनापासून अभिनंदन.

    ReplyDelete