स्वतःचे काम होण्यासाठी
टेबलाखालून दिली जाते लाच
विश्वासार्हतेची तडकते काच... [१]
हे भ्रष्टाचाराचे बाळकडू
लहानपणापासूनच पाजले जाते
'शांत बसलास तर चाॅकलेट देईन'
अशामुळेच तर घोडे पेंड खाते... [२]
सरकार बदलले तरी
भ्रष्टाचार थांबत नाही
भ्रष्टाचाऱ्यांना व्यवस्थेशी
देणे-घेणे नसते काही... [३]
भ्रष्टाचाराविरूद्ध सारे कायदे
भारतात व्हावे आता कडक
जो करेल भ्रष्टाचार या देशात
त्याच्यावर कारवाई व्हावी तडक... [४]
आपल्या भारतातला सारा
थांबवू आपण भ्रष्टाचार
या लोकशाही गणराज्यात
चला आणू पुन्हा शिष्टाचार... [५]
No comments:
Post a Comment