अजून येई ना ओठांवर
माझ्या मनातली प्रीत
कसे करावे सखी हितगूज ?
कधी येईल ओठी प्रेमगीत ?
धडधडतो माझा जीव
मनातले बोलणे मनातच अडते
जरा तरी करावी तू कीव
हे हृदयरागिणी, हे प्राणप्रिया
मला काही बोलायचे आहे
मीच तुझा हृदयराजा, प्राणनाथ
माझे हृदय खोलायचे आहे
आता होईना सहन
तुझा - माझा हा दुरावा
प्रेम माझे तूच आहे
मागू नकोस गं पुरावा
धुंद वेडे मन बोले
प्रेमाची सारी कहाणी
एकमेकांच्या सोबत दोघे
मी राजा, तू माझी राणी
हे सुंदरी, सखे, कामिनी
तू काय पाहिलंस माझ्यात
तुझा खरा स्वभाव पाहून
मी गुरफटले सख्या तुझ्यात
No comments:
Post a Comment