मस्जिदमध्ये अल्लाह राहतो
मंदिरात शंकर भगवान नांदतो
रूप वेगळे, पण कार्य समान
देऊयात आपण दोन्हींना मान... ॥१॥
रंग, रूप, वेष अलग भाषा
येथे 'विविधतेतूनच एकता' नांदते
प्रेमळ नात्यांची विण घट्ट बांधते.....॥२॥
रमजान ईदही येथे होते साजरी
शरदात येते पौर्णिमा कोजागिरी
नवरात्रीत दांडीया आणि रास
नाताळात रोषणाईची आरास.....॥३॥
प्रभूचे नामस्मरण त्याला पोचते
जेव्हा प्रार्थना सच्च्या मनाने होते
सर्व एकच, कोणताही असू दे धर्म
माणूसकी हेच आहे माणसाचे मर्म... ॥४॥
मंदिर, मस्जिद, अग्यारी, गुरूद्वारा
एकतेने देऊया बंधुभावाचा नारा
भारताच्या विविधतेची काढू आकृती
जपूया सुंदर भारतीय संस्कृती... ॥५॥
No comments:
Post a Comment