वसुंधरा
करूया जतन
वचन देऊ एकमेकांना
वसुंधरा
पाने, फुले
फळे, झाडे, वेली
फेर धरून नाचती मुले {२}
वसुंधरा
माणसाचा हव्यास
सारखी जंगलतोड केल्याने
होई पृथ्वीला खूप त्रास {३}
वसुंधरा
समुद्राचे पाणी
नदी, ओहोळ, धबधबा
पक्षी गाती मधुर गाणी {४}
वसुंधरा
पावसाने भिजली
झाडे उगवली जमिनीवर
हिरवा शालू नेसून सजली {५}
वसुंधरा
उडती पक्षी
थवा पोहोचला आभाळी
आकाशावर दिसते सुंदर नक्षी {६}
वसुंधरा
काळी माती
पिके वाढवते जोमाने
जोडूया पृथ्वीशी अतूट नाती {७}
No comments:
Post a Comment