Wednesday, February 13, 2019

लेक चालली सासरला... मराठी कविता... Marathi Kavita... Marathi Poem...


मुलगी असते परक्याचं धन
तिला कशी आपली म्हणू ?
माय-बाप शिंपल्याचं कोंदण
लेक लाडकी मोती जणू... ॥१॥
 

माझी लाडाची छकुली
कधी मोठी झाली कळेना ?
लेकीचा पाय उंबरठ्यावरून
सासरच्या दिशेने वळेना... ॥२॥
 

तिच्या सुखी संसारासाठी
माय - बापाचा आशीर्वाद
नांदो मुलगी आनंदाने
होऊ नये भांडण, वाद... ॥३॥
 

लेक चालली सासरला
फिरणार नाही माघारी
रडतात आई-वडील
रडती सारे शेजारी... ॥४॥
 

लेक जातांना सासरी
डोळ्यांतून तरळला भाव
बापाच्या डोळ्यांत नेहमी
दिसतो स्वप्नांचा गाव... ॥५॥
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment