Tuesday, September 24, 2019

पुण्याई... Marathi Kavita... Marathi Abhang... Marathi Poem... मराठी कविता... अभंग रचना....

 
 
 
 
 
 
 
सगळ्यांनी नित्य । करू जनसेवा ।
हाच एक ठेवा । आयुष्याचा ॥... १
 

एकदा मिळतो । मनुष्याचा जन्म । 
सेवा ही आजन्म । करायची ॥... २
 

उघड्याला वस्त्र । याचकाला पोळी ।
नि रूग्णाला गोळी । द्यावयाची ॥... ३
 

देऊया आपण । मदतीचा हात । 
संकटाला मात । सदोदीत ॥... ४
 

सेवा जरी दिली । नाही होत कमी ।
ही यशाची हमी । समजावी ॥... ५
 

आपली पुण्याई । येई सदा कामी ।
युक्ती हीच नामी । पारखावी ॥... ६
 

सेवेत असावा । पारदर्शीपणा ।
तो चांगुलपणा । नेहमीच ॥... ७
 
 
 
 

No comments:

Post a Comment