आले आले गणपती आले
मन साऱ्यांचे आनंदित झाले... ॥धृ॥
घेउनी ताट पुजेचे
हातात हार फुलांचा
गणपतीच्या स्वागताला
जमला घोळका मुलांचा... ॥१॥
स्वागत पार्वती नंदनाचे
चला थाटात करूया
"गणपती बाप्पा मोरया"
असे जोशात म्हणूया... ॥२॥
नैवेद्य बाप्पाला मोदकांचा
हिरव्या दूर्वांची जुडी
टाळ्या वाजवून म्हणूया
आरतीची न्यारीच गोडी... ॥३॥
आणली डाव्या सोडेंची
सुबक, सुरेख गणेशमूर्ती
तिची करून प्राणप्रतिष्ठा
लावल्या निरांजनात वाती... ॥४॥
ह्या लाडक्या लंबोदरालाpoemforcompetition
मूषक वाहन शोभते
मला गणपतीची गोडी
दिवसरात्र बाप्पाला पूजते... ॥५॥
आले आले गणपती आले
मन साऱ्यांचे आनंदित झाले...
No comments:
Post a Comment