Monday, September 2, 2019

हे गणेशा... Ganesh... Ganpati... Marathi Kavita... Marathi Poem... मराठी कविता...






हे गणेशा, हे गौरीनंदना
तू स्वीकार आमुची प्रार्थना... ॥धृ॥
 

आम्हां दिलेस जीवन
आयुष्य केलेस पावन
करतो तुला नमन
तू गणपती, तू गजवदना... ॥१॥
 

आम्ही तुझी लेकरे
जशी चिमणी पाखरे
तूच सर्वांचा बाप रे
तू गजकर्णा, तू गजानना... ॥२॥
 

होऊ दे आम्हां सबळ
वाढो बुद्धी प्रबळ
मनगटात यावे बळ
मनोभावे करतो वंदना... ॥३॥
 
 

No comments:

Post a Comment