Wednesday, August 28, 2019

प्रेम माझे... My Love... Marathi Kavita... Marathi Poem... मराठी कविता... Marathi Gazal... मराठी गझल...








प्रेम माझे तुला सांगणे राहिले
हात हातामधे गुंफणे राहिले
 

श्वास श्वासांत नाही मिसळले कधी
बावऱ्या भावना जाणणे राहिले
 

वेड होते, गुलाबी नशेचे जरी
गोड ओठांस त्या चाखणे राहिले
 

ना मिळाली मला, रेशमाची मिठी
सोबतीने तुझ्या वाहणे राहिले
 

वाहतांना फुले पार्थिवावर तुझ्या
का तुला शेवटी भेटणे राहिले ?
 
 

 

No comments:

Post a Comment