Wednesday, August 7, 2019

वरण भात... Dal Rice... Marathi Kavita... Marathi Poem... मराठी कविता...





 
 
 

 
तांदूळ सुगंधीत छान
त्याचा बनवला मऊ भात
भात घ्यायला ताटात
सरसावतो माझा हात... <१>

पिवळी डाळ तुरीची 
छान आणली बाजारातून
तिचे शिजवलेले वरण
भातासवे खावे ओरपून... <२>

सुगरणीने घराच्या सुरेख
ताटाभोवती काढली रांगोळी 
रांगोळीत फुले, वेली, पाने
रेखियल्या नक्षीच्या ओळी... <३>

गरम-गरम वरण-भात
त्यावर साजूक तूप
लवकर वाढावा ताटात
मला भूक लागली खूप... <४>

वरण - भाताच्या सोबतीने
दह्याची असावी कोशिंबीर
जेवणाचा बेत खास बनता
मोहरावी अंगी शीर - शीर... <५>

वरण - भाताचे हे भोजन 
खातांना मन होते तृप्त
अंग-अंग शरीराचे मग
झोपेमध्ये होत जाते लुप्त... <६>
 
 

 

No comments:

Post a Comment