Wednesday, August 14, 2019

सुगंधी क्षणांचा... Marathi Kavita... Marathi Gazal... Marathi Poem... मराठी गझल... मराठी कविता

 
 
 
 
 
सुगंधी क्षणांचा असर राहिलेला
जणू गोठलेला प्रहर राहिलेला
 

मिळो ऊब आजी, मला आठवांची
तुझ्या पैठणीचा पदर राहिलेला
 

कसे फूल फुलणेच विसरून गेले ? 
कदाचित ऋतूंचा बहर राहिलेला
 

गुलाबी मिठीतून सुटले जरी मी
तरी गुंतलेला अधर राहिलेला
 

तुझ्या सोबतीने बघत स्वप्न आहे
नि स्वप्नामधे तू हजर राहिलेला
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment